स्वराज्य फाउंडेशनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा केला सत्कार

633

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आलापल्ली:- महाराष्ट्रातील चिखली या शहरात नुकत्याच झालेल्या रशियन आर्मी स्पोर्ट हँड टू हँड स्पर्धेत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओढक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील खेळाडू चमकले.

गडचिरोली जिल्ह्यातील सचिव रवी चर्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूना एकूण दहा सुवर्ण पदक,चार रजत पदक व एक कांस्यपदक पटकावले.

आलापल्ली येथील खेळाडु उत्तम कामगिरी करून गावाचे नाव राज्यस्तरावर नेले म्हणून स्वराज्य फाउंडेशन तर्फे सगळ्या खेळाडू व प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले.