Homeचंद्रपूर"महात्मा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर तर्फे शैक्षणिक...

“महात्मा फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर तर्फे शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा”

चंद्रपूर:महात्मा जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर व्या विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाडा कॉलनी, एम. आय. डी. सी. चंद्रपूर येथील इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना समाजभिमूक उपक्रमाचा एक भाग म्हणून स्कुल बॅग, वॉटर बॅग, बुक्स, कपास, पेन असलेल्या शैक्षणिक साहित्य किटचे वाटप दिनांक ६ ऑगस्ट २०२२ ला करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना विजय उमरे अध्यक्ष म. जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर म्हणाले “तुम्हाला शैक्षणिक सुविधा प्राप्त करुन दिल्या यांचा चांगला उपयोग करुन पुढे जाल व भविष्यात उत्तम नागरीक बनून देशाची सेवा कराल.

प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावर दिलीप वावरे सचिव, उपाध्यक्ष मा. अजय जुमडे तथा चेतन उंदिरवाडे, राजू खोब्रागडे कार्याध्यक्ष, संघटन सचिव रमेश रामटेके, अशोक देवगडे – कोषाध्यक्ष आणि समितीचे मान्यवर कार्यकारिणी सदस्य श्याम दामले, रंजन सोरते व प्रमोद कावळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी आपले समायोचित विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. वंदना हुमने मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. जोतिराव फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या सर्व पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!