Homeचंद्रपूररखडलेली विकास कामे व प्रलंबित समस्यांचा तातडीने निपटारा करा - आ.विजय...

रखडलेली विकास कामे व प्रलंबित समस्यांचा तातडीने निपटारा करा – आ.विजय वडेट्टीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंदेवाही तालुक्यात आपण मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी प्राप्त करून दिला. मात्र तालुक्यातील ग्रामखेड्यांमधील बहुतांश विकास कामे ही रेंगाळलेली असून कामे करताना भेडसावणाऱ्या समस्या, अडसर निर्माण करणाऱ्या त्रुटी याचा लगेच वेळीच निपटारा करून विकास कामे पूर्णत्वास आना. असे स्पष्ट निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ते सिंदेवाही येथील पंचायत समिती विश्रामगृहात आयोजित आढावा सभेत अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित आढाव सभेस अध्यक्ष म्हणून राज्याची माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. नामदेवराव उसेंडी, तहसीलदार जगदाळे गटविकास अधिकारी सुकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष, माजी जि प सदस्य रमाकांत लोधे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, व तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी तथा काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, ग्रामीनांच्या मूलभूत सोयी व सुविधांसाठी महाविकास आघाडी सरकार काळात राज्याच्या कॅबिनेटमध्ये विविध विकास कामांकरिता कोट्यावधींचा नीधी प्रस्तावित करून ग्रामीण वासियांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून निर्णय घेतलेले आहेत. यातूनच सिंदेवाही तालुक्यासाठी कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. यात सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे एकट्या सिंदेवाही तालुक्यात घरकुल योजना अंतर्गत गरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी एकूण 881 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून हे ऐतिहासिक यश प्राप्त करणे तालुक्याचे सौभाग्य आहे. तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सुरक्षा भिंत ,नवीन अंगणवाडी इमारत, सिमेंट रस्ते, नाल्या, शुद्ध पेयजल आदीं महत्वपूर्ण योजनांसाठी देखील मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विकास कामात येणाऱ्या अडचणी ,जागा उपलब्धता अशा विविध समस्यांचा त्वरित निपटारा करून विकास कामे पूर्णत्वास आणावी असे स्पष्ट निर्देश देत विकास कामासंदर्भात कुठलीही दिरंगाई न करता नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करा असेही आवाहन आ. वडेट्टीवार यांनी केले. याप्रसंगी गुंजेवाही येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर चन्ने यांनी ग्रामस्थांच्या समस्या तळमळीने मांडल्या. यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी तथा काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉक्स – दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या अभियंत्याला फटकारले
सिंदेवाही पं. स. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी विभाग निहाय माहितीनुसार विकास कामांचा आढावा घेतला.यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता कोल्हे यांनी विकास कामांबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याने यावर आ. वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांला चांगलेच खडसावले. व वेळ मारून नेण्याऐवजी त्वरित विकास कामे पूर्णत्वास आणून नागरिकांना दिलासा द्या अशी तंबी ही दिली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!