HomeBreaking Newsनाल्यातील पाण्याचा फिल्टर न करताच नळाद्वारे पुरवठा

नाल्यातील पाण्याचा फिल्टर न करताच नळाद्वारे पुरवठा

गोंडपिपरी :-चेतन मांदाडे

गोंडपिपरी पासून सहा किलोमीटर अंतरावर करंजी हे गाव आहे. या गावात बर्‍याच वर्षापासून पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली. आणि गावकऱ्यांना नळाची सुविधा झाली. नाल्या मधील पाणी टाकी मध्ये येते आणि आणि टाकीमधील पाणी नळाद्वारे तसेच पुरवले जात आहे. पाण्यातील गाळ टाकीमध्ये जमा होतो. या गावातील चतुर्थ कर्मचारी हा पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर अथवा तुरटी टाकत असायचा : पण हे पाणी नाल्याचे असल्यामुळे पूर्णता शुद्ध होत नाही, असे खुद पाणीपुरवठा यांच्या चतुर्थ कर्मचारीच सांगतो. नळाद्वारे अत्यंत गढूळ पाणी येते. पावसाळ्यात तर पाणी पिण्यासारखे नसते. यामुळे गावकर्‍यांना अनेक आजारांशी लढावे लागते. पाण्याच्या टाकीत दहा वर्षापासून नाल्याचे पाणी येत असले तरी फिल्टर असून सुद्धा शुद्ध करण्याचे सौजन्य कोणीही दाखवले नाही. आम्हाला पिण्याचे पाणी फिल्टर करून मिळाले तर नागरिकांना आजार होण्याचे प्रमाण कमी होईल, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. हे गाव गट ग्रामपंचायत असल्याने बदली होऊन जाणारे ग्रामसेवक यांनी या विषयाकडे फारसे लक्ष दिले नाही, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे. आणि गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!