महागाई विरोधात महिला काँग्रेसची पत्र मोहीम.. पंतप्रधानांना पत्र – राज्यभरातून महागाईचा निषेध

656

सिंदेवाही: देशात सत्ता परिवर्तनासाठी सन २०१४ मध्ये भाजपाने संपूर्ण समाज माध्यम (सोशल मीडिया) व प्रसारमाध्यमांमध्ये “बहुत हुई महंगा की मार अबकी बार मोदी सरकार’ हा नारा देऊन नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात स्वतःला गोरगरिबांचे कैवारी तर काँग्रेस सरकारला महागाईला खतपाणी देणारे सरकार असे भासवत सर्वसामान्यांची मते जमवून केंद्रात सत्ता काबीज केली. मात्र सत्तेत येताच महागाई कमी करण्याऐवजी वारंवार पेट्रोल डिझेल ,घरगुती स्वयंपाक गॅस किंमतीत सातत्याने दरवाढ करून गोरगरिबांचे बजेट बिघडवत कंबरडे मोडले आहे. उद्योगपतींना झुकते माप देणाऱ्या मोदी सरकारच्या महागाई धोरणा विरोधात राज्य महिला काँग्रेसने कंबर कसली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून सिंदेवाही तालुका महिला काँग्रेस च्या वतीने महागाई विरोधात तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहे.

देशाचा सर्वत्र महागाईच्या भस्मासुराने डोके वर काढले असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. तर येत्या 18 जुलैपासून घरगुती अन्नधान्यांवर देखील ५ टक्के जीएसटी कर आकारल्या जाणार असल्याचे सूचना भाजप सरकारने केली असून अगोदरच राज्यात सत्ता परिवर्तनानंतर घरगुती गॅसवर ५० रुपये दरवाढ केल्यानंतर हा दुहेरी धक्का देण्याचे कार्य आता भाजप सरकारकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या दैनंदिन वस्तूंवरील दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून महिलांचेही आर्थिक बजेट बिघडले आहे. अशा बिकट परिस्थितीत मुलांना शिकवायचे कसे व खाऊ घालायचे काय असे दुहेरी संकट सर्वसामान्य नागरिक व गृहिणींपुढे यक्ष प्रश्नाप्रमाणे निर्माण झाले असून भाजपाने चालविलेल्या या दंडुकीशाही विरोधात त महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याकाळी सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर यांचे मार्गदर्शनात सिंदेवाही तालुका काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष सीमा सहारे यांचे नेतृत्व आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई विरोधात पत्र मोहिमेद्वारे महागाई कमी करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष आशाताई गंडाते, नगरसेविका पुजा रामटेके, तालुका काँग्रेस सरचिटणीस नंदा नरसाळे, नीता रामटेके, वैशाली पुप्रेडीवार, जयश्री नागापुरे ,स्नेहा नागापुरे ,मीनाक्षी मेश्राम ,प्रणाली जीवने ,पुष्पा मडावी ,नंदा बोरकर लता गेडाम, पुष्पा सिडाम उपस्थित होत्या.