गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस… सर्वत्र पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत…

1068

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

गडचिरोली: मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मूलचेरा या तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत.

यामध्ये नागरिकांना सर्वात मोठा फटका चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशयाचा बसला आहे. दोन दिवसाच्या अतिवृष्टीमूळे चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय तुडूंम भरलेला आहे. या जलाशयातील दीना नदीला पूर आल्याने आष्टी ते आल्लापल्ली, आष्टी ते मूलचेरा, घोट, देवदा, रेगडी, एटापल्ली हे मार्ग बंद झाले आहेत.

सर्व मार्ग बंद झाल्याने जिल्हा मुख्यालयाशी भामरागड, एटापल्ली, मूलचेरा, अहेरी, चामोर्शी या तालुक्याचा संपर्क तुटला आहे. सध्या रेगडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशी आव्हान पोलीस मदत केंद्र रेगडी येथील प्रभारी अधिकारी श्री, नंदकुमार शिंब्रे व भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा, समाजसेवक प्रशांत शाहा, उमेश मल्लिक, नितीन मंडल, उमेश शाहा, प्रकाश शाहा, विक्रम शाहा, आशीक नरोटे, शुभम कुंडू, अमित चक्रवर्ती यांनी केली आहे.