Homeचंद्रपूरब्रम्हपुरी तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवानी वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

ब्रम्हपुरी तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवानी वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

चंद्रपूर – तालुक्यातील ग्राम खेड्यातील आबालवृद्ध महिला व सामान्य नागरिक यांच्या समस्या जाणून घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता तसेच ग्राम खेड्यांचा सर्वांगीण विकास साधन्या हेतू पक्षपाताचे राजकारण बाजूला सारून क्षेत्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले.

याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि. प. सदस्या स्मिता पारधी, ब्रम्हपुरी तालुका महीला काँगेस अध्यक्षा मंगला लोनबले, प्रदीप गद्देवार ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर उर्फ सोनू नाकतोडे, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, माजी जि. प. सदस्य भावना इरपाते, ब्रम्हपुरी शहर महीला काँगेस अध्यक्षा योगिताताई आमले, न. प. नगरसेविका सूनिता तिडके, लताताई ठाकूर, वनिता अलगदेवे, नीलिमा सावरकर, माजी नगरसेवक जगदीश आमले, सोनेगाव चे सरपंच सोनु मेश्राम, पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय ब्रम्हपुरी जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, अमोल सलामे, सुरेश वंजारी , अण्णाभाऊ ठाकरे, सुचिता ठाकरे उत्तम बनकर, मनोहर मरे ,रीता तुपट सरपंच रुई ज्ञानेश्वर बुले,उपसरपंच रुई रामचंद्र बेंद्रे तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित होते.

सलग दोन वर्षे महा विकास आघाडी सरकारला वैश्विक महामारी कोरोना संकटाशी कंबर कसून दोन हात करावे लागले. अशा बिकट परिस्थितीत जनसामान्यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आनुन नागरिकांच्या आरोग्यसाठी अहोरात्र मेहनत घेतली. मागील दोन वर्षातही विकासाची कामे सुरू होती. मात्र कोरोणा महामारी संकट आटोक्यात येताच ब्रह्मपुरी मतदार संघातील ग्राम खेडयांचा सर्वांगीण विकास साधता हेतू नागरिकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी मनरेगा मातोश्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत तसेच काही ठिकाणी खनिज विकास निधीअंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी दिली. यात तालुक्यातील रंनमोचान येथील सिमेंट काँक्रिट रस्ता (१५ लक्ष ), रूई येथे दोन मुख्य सिमेंट रस्‍ता( ३० लक्ष), बेलपातळी येथे दोन सिमेंट कॉंक्रीट रस्ता (३० लक्ष), चीचगाव येथे सिमेंट रस्ता (१५ लक्ष) कोसंबी येथे दोन सिमेंट काँक्रीट रस्ते (३०लक्ष ) एकारा येथे सिमेंट काँग्रेस रस्ता(१५ लक्ष) रान बोथली व गायडोंगरी येथे सिमेंट काँक्रिट रस्ता प्रत्येकी ( १५लक्ष) असे एकूण दोन कोटी रुपयांच्या विकास निधींच्या कामांचा समावेश असून अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.

पावसाळी हंगामाच्या पूर्वार्धात होऊ घातलेल्या विकास कामांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्याच्या विकासात भर पडली. यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विकासाचा मार्ग सुकर झाला असून जनसामान्य नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवून नागरिकांना दिलासा दिल्याबाबत नागरिकांनी पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!