Home चंद्रपूर गोंडपिंपरी पोडसा येथील २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

पोडसा येथील २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

1071

-शरद कुकूडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी: तालुक्यातील तेलंगाणा लगत असलेल्या पोडसा (जुना) या गावातील 23 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी चंद्रपुर येथे घडली.
मृतकाचे नाव सारंग मोरेश्वर येलमूले असून तो पोडसा येथिल रहिवाशी होता. सारंग हा चंद्रपूर येथे नगिना बाग मध्ये भाड्याने रुम करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अश्यातच ‌दि.14 जून ला रात्री गळफास घेऊन आपली जिवनयात्रा तिथेच संपविली. आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल होऊन, त्यांचा पंचनामा केला शव ताब्यात घेतले व शवनिच्येदनासाठी पाठविले, पुढील तपास पोलिस करीत आहे…

Don`t copy text!