Home Breaking News मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

1679

चक्रधर मेश्राम

पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला आहे. यामुळे त्यांना खूप ताप आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. न्यूमोनियाचा असर कमी झाला अन् शारिरीक ताकद वाढली की त्यांच्या कँसरचे उपचार सुरु करणार असल्याची माहिती कळते. त्यांच्या विविध तपासण्याही सुरु आहेत. दरम्यान, कुणीही फोन करुन डिस्टर्ब न करण्याची विनंती आमटे कुटुंबीयांनी केली आहे.
काय आहे हेअरी सेल ल्युकोमीया ?
हेअरी सेल ल्युकेमीया हा रक्ताचा दुर्मिळ कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती करते. ते अतिरिक्त निर्मितीमुळे या पांढऱ्या पेशी तारक ऐवजी मारक ठरतात. हा कर्करोग झालेल्या रुग्णांना सतत अशक्तपणा जाणवतो. तसेच वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, अति घाम येणे, दम लागणे, हाडांचे दुखणे, त्वचेवर लाल ठिपके येणे असे त्रास जाणवतात.

Don`t copy text!