Homeनागपूरआज अ.भा.अंनिस युवा शाखेची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा

आज अ.भा.अंनिस युवा शाखेची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा

नागपूर : अखील भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती – युवा शाखा द्वारा चाळीस वर्षपूर्ती प्रबोधन महोत्सव निमित्त राज्यात ‘युवा संघटण बांधनी अभियान- २०२२’ राबविले जात आहे. या अंतर्गत नागपूर ,गडचिरोली, वर्धा जिल्हा स्तरीय संयुक्त महिला व युवा शाखा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज २९ ते ३१ मे दरम्यान करण्यात आले आहे.

राज्यात विविध जिल्ह्यात निवड प्रक्रिया राबवून निवडक युवा कार्यकर्त्यांसाठी अशा कार्यशाळा युवा शाखा आयोजित करीत आहे. सदर कार्यशाळेचे उद्घाटन ‘लढा अंधश्रद्धा निर्मूलनाचा’ मासिकाचे कार्यकारी संपादक तथा प्रसिद्ध गझलकार संजय इंगळे तिगावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर हेपट जिल्हा अध्यक्ष अ.भा.अंनिस गडचिरोली, आकाश जयस्वाल जिल्हा सहसंघटक अ.भा.अंनिस वर्धा, सुनीता जाने , आर्वी तालुका संघटक अ.भा.अंनिस महिला शाखा जि. वर्धा, मंजुषा खुदरे सचिव नागपूर महानगर अ. भा. अंनिस युवा शाखा उपस्थित राहणार आहे.
सदर प्रशिक्षण हे आभासी पद्धतीने दि २९,३०,३१ मे रोजी साय. ७ ते रा. ९.१० या वेळात होईल.
कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे , पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख सुधीर आंडे , वर्धा जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनील वंजारी. गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मनोहर हेपट , कारंजा (घा.) तालुका संघटक राजकुमार तिरभाने मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे.
कार्यशाळेत आपण अंधश्रद्ध का होतो ? आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास, आत्मा, चकवा, चेटूक, भानामती , देवी, भूत अगात येणे, नरबळी, जादूटोणा, तंत्र मंत्र , संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार, चमत्कारा मागील विज्ञान, फलज्योतिष्य, वास्तुशास्त्र, आधुनिक अंधश्रध्दा इत्यादी अनेक विषयानसह जादूटोणा विरोधी कायदा यावर मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवसीय कार्यशाळेत पूर्ण वेळ उपस्थित कार्यकर्त्ये, विद्यार्थी, युवक – युवतींची विविध स्तरावर युवा शाखा कार्यकारणीत निवड केली जाणार आहे.
कार्यशाळेत सहभागी होणाचे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शाखा सचिव हर्षाली लोहकरे , युवा शाखा आय. टी. प्रमुख युवराज राठोड, राज्य युवा प्रसिद्धी प्रमुख सेजल फेंडर , कार्यशाळा आयोजन समितीचे निलेश मिसाळ , सतिश इंगोले , तेजस्विनी क्षिरसागर , माया रहांगडाले , नागपूर जिल्हा युवा संघटक श्रावण खुदरे , वर्धा जिल्हा युवा संघटक सुमित उगेमुगे , गडचिरोली जिल्हा युवा संघटक निवास कोडाप, गोंदिया युवा संघटक कमलेश शरनागत, प्रा.अविनाश खिल्लारे, अमृता अदावडे , नासीर पठान, रितेश पाटील, सुमेध जाधव , स्नेहल वैद्य, केतकी देवतळे यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!