Homeचंद्रपूरडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानजनक मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध अट्रॉसिटी दाखल करा -...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानजनक मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध अट्रॉसिटी दाखल करा – समाज समता संघ…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या समाज कंटकाविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी समाज समता संघाच्या राज्य शाखेने केली आहे.
यासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार सविस्तर वृत्त असे की,पुणे जिल्यातील जुन्नर येथील दिनेश परदेशीं नामक व्यक्तीने फेसबुकवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह मजकूर टाकला.
सदर मजकूरामुळे आंबेडकरी समुदायात प्रचंड असंतोष निर्माण झाला,प्रचंड चीड निर्माण झाली.पुणे परिसरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
समता समाज संघाच्या राज्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्नर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार नोंदवली आणी सदर समाजकंटकाविरुद्ध अट्रॉसिटी दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली.
सदर व्यक्ती सध्या फरार असल्याचे कळते.तो भाजपशी संबाधित असल्याचेही बोलल्या जाते.जुन्नर पोलीस चौकशी करत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!