31 मे रोजी पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन

492

नागपूर: राज्यातील Petrol pump पेट्रोल पंप चालकांनी येत्या मंगळवारी आंदोलन पुकारले आहे. या दिवशी पेट्रोल-डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल-डिझेल असोसिएशनने घेतला आहे. डिलर्सचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. नुकतेच पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर केंद्राकडून कमी करण्यात आल्याने पेट्रोलच्या किमतीत घट झाली आहे. यामुळे Petrol pump पंप मालकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आम्ही जास्त किंमत देऊन इंधनाची खरेदी केली होती. पण दरात कपात झाल्याने आम्हाला हा स्टॉक आता खरेदी केलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत विकावा लागत आहे, असे Petrol pump पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इंधन खरेदी न करण्याच्या या अनोख्या आंदोलनाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा Petrol pump पेट्रोल पंप डिलर असोसिएशनने केला आहे. केवळ डिलर कमिशन वाढवणे ही एकच मागणी नाही तर केंद्र सरकारने अचानक शुल्क कपात केल्याने Petrol pump पेट्रोल पंप चालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्याची भरपाई मिळावी, ही देखील मागणी आहे. या आंदोलनातून इंधन वितरक कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पेट्रोल डिलर असोसिएशनचे रवी शिंदे यांनी सांगितले. हे आंदोलन देशभरात होणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी पेट्रोल डिलर कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाहीत. परिणामी महामार्गांवर, निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या Petrol pump पंपावर इंधनाचा साठा संपण्याची शक्यता आहे.