राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

573

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे)

येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी केली आहे.

राज्याच्या नगर विकास खात्याचे राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांना प्रत्यक्ष भेटून चंदेल दांपत्यानी गोंडपिपरी येथील समस्याबाबत चर्चा केली आणी दोन कोटी रु च्या विकासनिधीची पत्राद्वारे मागणी केली. महेंद्रसिंह चंदेल प्रभाग क्र 5,तर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सविता या प्रभाग क्र 6 येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत.