Homeचंद्रपूरगोंडपिंपरीराजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप...# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल माफियांनी ताबा मिळवून पूर्णतः पोखरुन रात्रदिवस रेतीची वाहतूक करण्याची जनू स्पर्धाच चालविली आहे.यामूळे तालुकावासियांची झोप उडाली आहे.बिनधिक्कतपणे होणाऱ्या या कामात महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रात्रंदिवस चालणाऱ्या रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? आसा संतप्त सवाल आता तालुकावासिय विचारु लागले आहेत.

गोंडपिपरी तालुक्या सभोवताल बारमाही नद्या आहेत.यात उच्च दर्जाची रेती आहे.काही दिवसांपूर्वी शासनाने तालुक्यातील घाटांचे लिलाव केले.यात तालुक्यातील एक घाट राजूरा येथिल एका व्यापाऱ्याने घेतला.गोंडपिपरी तालुक्यासाठी जुन्याच असलेल्या या व्यापाऱ्याने आपल्या पूर्वानूभवाच्या जोरावर नियोजन आखले.महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या नियोजनानंतर सदर माफियाने या घाटावर बेधूंद कारभार सूरू केला.रात्रभर चक्क पोकलेनच्या सहाय्याने रेतीचा उपसा केला जातो.यानंतर उपसा केलेली रेती हाॕयवातून ओव्हरलोड भरुन क्षमता नसलेल्या मार्गावरुन बिनदिक्कतपणे नेली जाते.या ओव्हरलोड वाहतूकी मार्गाची ऐशीतैशी होतांना दिसत आहे.असेच एकदा या गावच्या गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी चक्क ग्रामपंचायतीच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला होता.आता मात्र रात्रदिवस बिनदिक्कतपणे ओव्हरलोड वाहतूक होऊन देखिल स्थानिक पदाधिकारी आणि गावकरी गप्प असल्याने अनेक शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.अश्यातच तालुक्यातील लिखितवाडा-आक्सापूर आणि वढोली गोंडपिपरी मार्गाने रात्रभर रेतीची वाहतूक केली जात आहे.रात्रभर होणाऱ्या वाहतूकीमुळे मार्गावरील गावकऱ्यांची झोप उडाली आहे.यात काही ठिकाणी बनलेला नवाकोरा मार्ग उखडला आहे.असे असले तरी सबंधित विभाग आणि महसूल विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.यामूळे रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? असा सवाल विचारला जात आहे.

—————————————
(बाॕक्स-१)

…..पुन्हा किती बळी ?

शेजारच्या पोंभुर्णा तालूक्यातील भिमणी घाटावर रेती भरलेला ट्रक घाटाबाहेत काढतांना अपघात झाला.यात पोकलेन आॕपरेटरचा जागिच मृत्यू झाला.ही घटना मध्यरात्री घडली.या गोरखधंद्यामुळे आजतागायत अनेकांचे बळी गेले आहेत.किरकोळ आपघात तर नेहमिचेच आहेत.असे पुन्हा किती बळी गेल्यावर महसूल विभागाचे डोळे उघडतील ? असा संतप्त सवाल तालुकावासिय विचारत आहेत.

————————————-
(बाॕक्स -२)

राजूरानंतर आता चंद्रपूरकरांची गोंडपिपरीकडे वक्रदृष्टी

गोंडपिपरी-राजुरा विधानसभा क्षेत्र असल्याने हे समिकरण जुणे आहे.गोंडपिपरीतील रेतीघाटांचे रिमोट राजूऱ्यांवरुन हाताळले जाते.यात ते यशस्वी देखिल होऊन “माया” जमवित आहेत.असे असतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघाटांवर राजूराच्या मदतीने चंद्रपूर येथिल राजकीय पक्षाचे पुढारी येत्या दिवसात अतीक्रमण करण्याचे धडे घेत आहेत.

—————————————-
(बाॕक्स -३)

रेतीमाफियांच्या हैदोसाने तालुक्यातील वढोली येथिल विद्यूत वितरणाचा पोल तुटला.यामूळे माफियांची पोलखोल केली.यात वढोली वासियांना रात्रभर अंधारात काढावी लागली.यानंतर पुन्हा दोन दिवसांनी रेचीमाफियांची जत्रा सुरु झाली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!