स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

518

बळीराम काळे /जिवती

जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम राहण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना आहे.
तालुक्यातील कोलाम आदिवासींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बच्चू कडू, राज्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान पहिल्या दिवशी रात्रौ पावणे बारा ते एक च्या दरम्यान सितागुडा येथे पोहोचले. छोट्याशा कोलाम गुड्यावर मंत्री आले म्हणून त्यांचे स्वागत आदिवासी पारंपारिक नृत्याने करण्यात आले. त्यानंतर बच्चू कडू, राज्यमंत्री यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून व्यथा जाणून घेतल्या. आणि सितागुड्यावर मोकळ्या जागेत एका खाटेवर निवांत झोप घेतली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली.
व दूसऱ्या दिवशी खडकी रायपूर या गुड्यावर भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या खडकी रायपूर वरून जाताना शेणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. जिवती तालु्क्यातील अधिकारी यांना कोणताही अनुचित जमाती,आदिम कोलम व ईतर बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे,अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,शालेय शिक्षण,महिला व बालविकास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्यु कडु यांनी केल्या.आरोग्याचा प्रश्न,असो की, ईतर,सितागुडा येथील कोलम नागरीक राज्यमंत्री बच्चु कडु म्हणाले, सितागुडा येथील कोलम बांधव यांच्याकडे साध्य रेशन कॉर्ड उपलब्ध नाही.त्यांना रेशन कॉर्ड उपलब्ध करून दिल्यास त्यांना स्वस्त धान्यचा लाभ मिळेल.दुर्गम भागातील कोलम बांधव यांना रेशन कॉर्ड उपलब्ध व्हावे यासाठी ६ ते १६ जूनपर्यंतच्या कालावधीत रेशन कॉर्ड मोहीम यशस्वी करावी.व पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानात वेळोवेळी भेटी द्याव्यात.तसेच जलसंधारण कामाबाबत ऑक्यशन प्लॅन तयार करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सुचानाही दिल्या आहेत.
यावेळी माजी आमदार वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे,प्रा.प्रशांत कडू,डॉ. दिपक चटक, तहसीलदार प्रवीण चिडे, गट विकास अधिकारी पेंदाम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे,आरोग्य अधिकारी डॉ.कविता शर्मा, बालविकास अधिकारी स्वप्नील जाधव,पुरवठा निरीक्षक सविता गंभीरे तसेच कोलाम बांधव उपस्थित होते. व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.