Homeचंद्रपूरगोंडपिंपरी'त्या' बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)
…’खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा …’ या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली.
सदर बातमी अनेक जणांनी वाचली आणी या बातमीचा इंपॅक्टहि दिसून येत आहे. ही बातमी वाचून चंद्रपूर स्थित झेप व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ पालीवार् यांनी खेमदेव गरपल्लीवार् ,त्यांची नगरसेविका पत्नी सौ शारदा गरपल्लीवार् यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाचारन् केले.आणी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
खेमदेव गरपल्लीवार् यांनी व्यसनमुक्ती केंद्रात भरती असलेल्या व्यसनाधीन झालेल्या लोकांसमोर आपले गत काळातील कटू अनुभव कथन केले.आणी व्यसनाच्या जाळ्यातून मी कसा मुक्त झालो याबाबत सविस्तर स्वानुभव कथन केले.
व्यसनमुक्तीकरिता व्यसनमुक्ती केंद्रात भरती झालेल्या लोकांना गरपल्लीवार यांच्याकडून निश्चित काही प्रेरणा मिळाली असणार… ! गरपल्लीवार् यांनी नवजीवन देणाऱ्या झेप व्यसनमुक्ती केंद्राबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
सदर बातमीमुळे गरपल्लीवार् यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!