Home आरोग्य ...खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा...

…खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)
सामान्यता मद्य विक्रीचा व्यवसाय करणारा व्यक्ती मद्याचा महिमा गात असतो,मद्याचे समर्थन करणारी भूमिका घेत असतो.कारण त्याचा तो धंदा आहे आणी त्यातून तो आर्थिक प्राप्ती करत असतो.
पण मद्यविक्रीचा व्यवसाय करणारा व्यक्ती चक्क व्यसनमुक्तीसाठी धडपडत असेल तर ….काय म्हणता ?शक्य नाही ..!
वस्तुस्थिती आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की,गोंडपिपरी येथील प्रसिद्ध सामाजिक,राजकीय कार्यकर्ते खेमदेव किसन गरपल्लिवार यांच्या मालकीचे प्रणयमन्थन बिअर बार आणी शॉपीं आहे.सुमारे 10,12 वर्षांपूर्वी त्यांना लायसन्स मिळाले.मधल्या काळात जिल्ह्यात दारूबंदी झाली.
त्यामुळे मद्यविक्रेत्यात नैराश्य निर्माण झाले..!खेमदेव गरपल्लीवार यांच्यातही नैराश्याची भावना निर्माण झाली असेल..!
त्यांनी मद्याशी सोयरीक केली..अगदी घनिष्ठ नातं निर्माण झालं मद्याशी..मद्याच्या प्याल्यात आकंठ बुडाले ते …! मद्य म्हणजे जीव की प्राण झाला त्यांचा. खेमदेव गरपल्लीवार् संपल्यागत आहे असे अनेक जन तेव्हा म्हणाले होते…!
त्यांच्या पत्नीने त्यांना झेप व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले.तेथे त्यांचे मन लागेना..अनेकदा तिथून ते पळून आले.त्यांच्या पत्नीने हिम्मत हारली नाही.परत परत त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले.’या माणसाला माणसात आणीनच ‘असा जणू पणच् त्यांच्या पत्नीने केला होता …!
त्यांच्या पत्नीने तब्बल 28 वेळा व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले.शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले.वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात भरती झाल्याने तेथील तज्ञ समुपदेशक मंडळींच्या समुपदेशनाचा खेमदेव यांच्या अंतर्मनावर खोलवर सकारात्मक परिणाम घडून आला.आता ते पूर्ण नशामुक्त झाले आहेत.याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या पत्नीला दिले पाहिजे.
महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवली..खेमदेव गरपल्लीवार यांचेही दारू दुकान सुरु झाले.त्यांच्या मालकीची शॉपी आणी बिर्याणी सेंटर ही सुरु आहे.त्यांचे सध्या सुव्यवस्थित सुरु आहे.त्यांच्या सुजाण पत्नी सौ शारदा या विद्यमान नगरसेविका आहेत.
आता खेमदेव यांनी ‘मद्यामुळे माझ्यासारखी गत इतरांची होऊ नये ‘ यासाठी सोशल मीडियावरुन दारूबद्दल जनजागरण चालवले आहे,दारूमुळे व्यक्ती,त्याचे कुटुंबं कसे उध्वस्त होते यासंदर्भातले पोस्टर्स ते सोशल मीडियावरून फिरवताहेत.व्यसन् मुक्ती केंद्रात मिळालेल्या ज्ञानाचा ते प्रचार,प्रसार करताहेत.
‘तुम्ही स्वतः मद्याविक्रीचा व्यवसाय करता आणी दुसरिकडे व्यसनमुक्तीही चालवता ..हे कसे?
या आमच्या प्रश्नावर ते म्हणतात, ‘लोकांनी पिण बंद केले पाहिजे, दुकानें आपोआप बंद होतील …..!
एकेकाळी मद्यामुळे उध्वस्ततेच्या,दारिद्र्याच्या कडावर असलेले खेमदेव गरपल्लीवार आज सुस्थितीत आले आहेत.जवळपास त्यांचा पुनर्जन्म झाला आहे.व्यसन सोडलं तर जीवनात किती सकारात्मक बदल घडू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण खेमदेव गरपल्लीवार…!

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

Recent Comments

Don`t copy text!