Advertisements
Home चंद्रपूर बल्लारपूर प्रिया झांबरे यांची भ्रमणध्वनीवरून मुख्य सचिवांशी चर्चा... बल्हारपूर तलाठी रेकॉर्ड मधील सातबारा...

प्रिया झांबरे यांची भ्रमणध्वनीवरून मुख्य सचिवांशी चर्चा… बल्हारपूर तलाठी रेकॉर्ड मधील सातबारा खोडतोड प्रकरण…

चंद्रपूर- जिल्ह्यात सध्या बल्हारपूर तलाठी दप्तर मधील आदिवासींना वाटपात मिळालेल्या शेतजमिन सातबारातील खोडतोड प्रकरण चांगलेच गाजत असुन या बाबतीत वरिष्ठांकडे एक दीड महिन्यांपूर्वीच तक्रारी गेल्या आहे . सदर प्रकरणाची चौकशी अतिशय धिम्या गतीने सुरु असल्यामुळे तलाठी दप्तर मधील सातबारातील नोंदी खोडणारा तलाठी कोण आहे.हे अद्याप जरी कळू शकले नसले तरी बल्हारपूरचा विद्यमान तलाठी रोहित सिंग चव्हाण याचा निष्काळजीपणा सर्वस्वि कारणीभूत असल्याचे तक्रार कर्त्या प्रिया झांबरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
काल मंगळवार दि. १० मे रोजी आदर्श मिडीया एसोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तसेच युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्लारपुर विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी मुख्य सचिव मुंबई यांना परत एकदा ई-मेलच्या माध्यमातुन याच प्रकरणा बाबत तक्रार केलेली आहे. या शिवाय भ्रमणध्वनीवरून त्यांचेशी चर्चा केली असल्याची माहिती खुद्द झांबरे यांनी या प्रतिनिधीला आज दिली. कश्या प्रकारे सरकारी रेकार्ड मध्ये खोडतोड करण्यात आली व कश्या पद्धतीने सन २०२० मध्ये खोटे व बनावटी आदेश तयार करुन वर्ग २ ची जमीन (वाटपाची ) जमिन वर्ग १ मध्ये रुपान्तर करण्यात आली. या बाबत माहिती दिली. या शिवाय सन २०१४ च्या विसारपत्रातील लिहीलेल्या लेखा मध्ये स्पष्ट पणे वर्ग २ चा उल्लेख आहे .त्यास नोटरी केलेली आहे.सन २०१९ मध्ये विसार रद्द करण्यात आले. त्यानंतर सन २०२० मध्ये तलाठी रोहितसिंग चव्हाण यांनी सरकारी दप्तर मधील सातबारात खोडतोड केली असल्याचे नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अश्या एक नाही तर अनेक आदिवासींच्या जमिनीच्या रेकार्ड मध्ये खोडतोड करुन आदिवासी जमीनी गैर आदिवासीच्या नावाने खरेदी विक्री केल्याचे प्रकार तसेच तलाठ्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे प्रकार समोर येऊन सुद्धा तलाठी चव्हाण यांचेवर कोणतीही कारवाई केली उलट कारवाई न करता तहसिलदार संजय राईंचवार साहेब तलाठी ला पाठीशी घालुन चुका दुरुस्ती करण्याच्या मागे लागले. सर्वे नंबर २०१/१ बदल विचारना केली तेव्हा सुद्धा तहसिलदार चुका दुरुस्ती केल्याचे बोलले, पण आम जनतेला, सामाजीक कार्यकर्तांना प्रश्न पडला की आदिवासी ची जमीन गैर आदिवासी च्या नावाने रजिस्ट्री झाली कशी, यात तलाठी चा दोष नाही काय?? आम जनतेला हे दोष स्पष्ट दिसते मग तहसिलदार साहेबांना दोष का दिसुन येत नाही?? या मागील कारण तरी काय?? जेव्हा मुल चे उपविभागीय अधिकारी खेडेकर साहेब कर्तव्यात कसूर करणार्या तलाठी ला तात्काळ निलंबित करुन चौकशी करतात मग तोच नियम बल्लारपुर च्या अधिकार्यांना लागु नाही काय?? शासकीय सेवेत कर्तव्यदक्ष असणार्या प्रत्येक अधिकार्यांच्या निदर्शनास येऊन सुद्धा सर्वांचे तलाठी रोहितसिंग चव्हाण कडे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी मुख्य सचिवांशी बोलतांना सांगितले असल्याचे या वेळी त्या म्हणाल्या. आता या प्रकरणात नेमकी कारवाई कोणावर होते या कडे सा-या चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

Advertisements
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पुलाच्या अपघाताला रेल्वे अधिकारी व येथील मंत्री जबाबदार – वंचित बहुजन आघाडी

प्रलय म्हशाखेत्री (जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर) चंद्रपूर: बल्लारपूर रेल्वेस्टेशन वरील पादचारी पुलाला भगदाड पडून त्यातून प्रवासी खाली रेल्वे रुळावर कोसळण्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथे रविवारी सायंकाळी...

रेल्वे पूल अपघाताची सखोल चौकशी करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या – माजी मंत्री आ. वडेट्टीवार

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर काल सायंकाळचे सुमारास पादचारी पुलाला अपघात होऊन यात एकाचा नाहक बळी गेला तर अनेक जण जखमी झाले. सदर अपघाताची सखोल चौकशी...

ब्रेकिंग: बल्लारपूर रेल्वेब्रीज कोसळला; अनेकजण गंभीर जखमी…

चंद्रपूर : जिल्यातील मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पुल अचानक कोसळल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा: आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 1 डिसेंम्बर पंचशील भवन कोरपना इथे राजुरा...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!