Homeगडचिरोलीगोंडवाना विद्यापीठ सॉफ्टबॉल संघ रवाना

गोंडवाना विद्यापीठ सॉफ्टबॉल संघ रवाना

गौरव लुटे (आरमोरी तालुका प्रतिनिधी)

गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठ येथे सॉफ्टबॉल संघांचे प्रशिक्षण शिबीर दिनांक 21/03 ते 25/03/2022 रोजी क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अनीता लोखंडे मॅडम यांच्या देखरेखेत विद्यापीठाच्या प्रांगनावर संपन्न झाले .
24 ते 30 मार्च दरम्यान आचार्य नागर्जुना विद्यापीठ गुंटूर(आंध्रपदेश)येथे होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ संघ सज्ज झाला आहे. विद्यापिठाच्या सराव शिबीरात एकूण… खेळाडूंनी सहभाग घेतला त्या पैकी 16 खेळाडू हे गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

विद्यापीठ संघ पुढीप्रमाणे

महेश सोनवणे याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आले आहे. खीलेश्वर कष्टी, गौरव नागपुरे, मंथन दिवटे, कर्नल वकुडिकर, कुणाल प्रधान, क्षितिज गळमले, अंकित भसारकर, तोकेश कोल्हे, शुधांशू खेडकर, अजय सारण, राकेश दिघोरे, विनय दिवटे, सिद्धांत बोरकर, या संघासोबत प्रशिक्षक म्हणून कोमल शेंडे, शेषराज खेडकर, सुभम वासके आणि संघ व्येवस्थापक म्हणून डॉ. शुभाष शेकोकर हे असणार आहे.

या संघाला स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे सर,रजिस्ट्रार डॉ. अनिल चिताडे सर व क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अनीता लोखंडे मॅडम इत्यादी यांनी शुभेच्छा दिल्या…..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!