गोंडपिपरी तालुक्यात अडेगाव येथील जोत्सना पिपरे उत्कृष्ट मदतनीस पुरस्काराने सन्मानीत.

685

शरद कुकूडकर भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : महिला व बालकल्याण विभाग जिल्ह्या परिषद चंद्रपूर यांच्या वतीने सन 2021-2022 चा उत्कृष्ट मदतनीस पुरस्कार जाहीर करण्यात आला.यात गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडेगाव येथील अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या जोत्सना पिपरे याना उत्कृष्ट मदतनीस पूरस्काराणे सन्मानित करण्यात आल्याची माहिती पिपरे यांनी आज दि.22 मार्च रोज मंगळवारला दिली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पूरस्कार देण्यात आले.उत्कृष्ट अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका पुरस्काराचे आयोजन मा.सा.कन्नमवार सभागृहात करण्यात आले.
यात उत्कृष्ट मदतनीस म्हणून गोंडपीपरी तालुक्यातील अडेगाव येथील जोत्सना पिपरे यांना देण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.