तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये “समुपदेशनाची गरज आणि प्रक्रिया” या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन..

304

-सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक)

नागपूर: युगांतर शिक्षण संस्था द्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या ‘ऍडव्हान्स पि जी डिप्लोमा इन कॉन्सलिंग’ अँड ‘वन इयर डिप्लोमा इन स्कुल कॉन्सलिंग’ आणि इनर व्हील क्लब ऑफ नागपूर, ऑरेंज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुपदेशनाची गरज आणि प्रक्रिया’ या विषयावर एक दिवसीय विभागस्तरीय सेमिनारचे आयोजन गुरुवार, दि, २४ मार्च २०२२ ला तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त संस्था), सिव्हिल लाईन, सदर, नागपूर येथे करण्यात आले आहे.

या सेमिनारला मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर च्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एन. आर. मृणाल उपस्थित राहणार असून ते मार्गदर्शन करतील. सोबतच ‘समुपदेशनाची प्रक्रिया’ या विषयावर तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी, ‘समुपदेशनातील नवीन तंत्र आणि पद्धत’ या विषयावर मानसिक रोग तज्ञ श्रीमती रिता अग्रवाल आणि ‘एक चांगला सल्लागार होण्यासाठी काय आवश्यक आहे’ या विषयांवर कौटुंबिक न्यायालय, नागपूरच्या निवृत्त समुपदेशक डॉ. मंजुषा कानडे मार्गदर्शन करतील..

एक दिवसीय सेमिनारला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. शिल्पा पुराणिक, प्रा. शिल्पा जिभेनकर, श्रीमती पदमा देठे, श्रीमती कोमल अकबारी, प्रा. संध्या फटींग, डॉ. रोशन गजबे, श्रीमती माधवी पेदादा आणि दिनेश मंडपे यांनी केले आहे…