Homeगडचिरोलीपत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपिएफ जवानाची आत्महत्या

पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपिएफ जवानाची आत्महत्या

गडचिरोली : पत्नीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच सीआरपीएफ जवाना (CRPF Jawan)ने स्वतःवर गोळी घालून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली आहे.

चंद्रभूषण जगत असे आत्महत्या (Suicide) केलेल्या जवानाचे नाव आहे. जगत हा जवान गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होता. केंद्रीय राखीव दलाच्या 113 क्रमांकाच्या बटालियन कॅम्पमध्ये चंद्रभूषण कार्यरत होता. मयत जवान हा छत्तीसगड राज्यातील बिलासपुर कुकुर्दीकरा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. (CRPF jawan commits suicide in gadchiroli after wife’s death)

पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच जवानाची आत्महत्या

मयत जवान चंद्रभूषण जगत याच्या पत्नीने छत्तीसगड राज्यातील बिलासपुर कुकुर्दीकरा येथे आपल्या गावी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पत्नीच्या आत्महत्येची माहिती चंद्रभूषणला फोनवरुन कळविण्यात आली. पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच गडचिरोलीतील धानोरा येथे कार्यरत असलेल्या चंद्रभूषणने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!