दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
दि. 04 : शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन महाडिबीटी प्रणाली मार्फत अंमलबजावणी करण्यात आली असून त्यानुषंगाने यावर्षी जिल्हा पातळीवर शालांत मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याची अंमलबजावणी 28 फेब्रुवारीपर्यंत होती. आता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन डिबीटी अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज 31 मार्चपर्यंत https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नियोजित वेळेत सादर करावे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी कळविले आहे.