Homeनागपूर7 मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

7 मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

दिनेश मंडपे 
नागपूर जिल्हा प्रतिनिधी 

दि. 04 : महिन्याच्या पहिल्या सोमवारी 7 मार्चला दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे करण्यात आले आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून 7 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल करणाऱ्या नागरिकास व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हायचे आहे.
लोकशाही दिनात करावयाचे तक्रार व निवेदन अर्ज वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांचेमार्फत आयुक्त, नागपूर महापालिका व सभापती, नागपूर सुधार प्रन्यास यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्र्यपणे लोकशाही दिनाचे आयोजन त्यांचे कार्यालयात करण्यात येत असल्यामुळे सदर कार्यालयाशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल न करता संबंधित कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात सादर करण्यात याव्यात.
न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपील प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रीयेचे अंतर्भाव असलेली प्रकरणे, सेवा विषयक, नोकरी व आस्थापना विषयक प्रकरणे, कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेले प्रकरणे, आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेली प्रकरणे लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!