Homeनागपूरमराठा समन्वय मंच, नागपूर तर्फे आयोजित ‘छत्रपती शिवराय जन्मोत्सव सोहळा-२०२२’

मराठा समन्वय मंच, नागपूर तर्फे आयोजित ‘छत्रपती शिवराय जन्मोत्सव सोहळा-२०२२’

दिनेश मंडपे
नागपूर शहर अध्यक्ष

मराठा समन्वय मंच, नागपूर तर्फे आयोजित ‘छत्रपती शिवराय जन्मोत्सव सोहळा-२०२२’ शहरातील अमर नगर येथील समाज भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रूपेश भोसले, उच्च शिक्षण विभाग,नागपूरचे प्रशासन अधिकारी अशोक बागल, बिनतारी संदेश नागपूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक विजय मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी अकोला, अमरावती, उमरेड, हिंगणघाट, कारंजा येथील माजी सैनिक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिकांचा सहभाग असलेले एकसष्ठ ज्येष्ठ मराठा पिता सन्मान, बावीस युवा मराठा व्यावसायिक सन्मान तसेच मंचाद्वारे आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी रामटेक येथील दीपशिखा देशभ्रतार (इयत्ता नववी), द्वितीय क्रमांकाची मानकरी विधी कोहळे (इयत्ता दहावी), तृतीय क्रमांकाची विजेती समृद्धी घाडगे (इयत्ता आठवी), चतुर्थ क्रमांक प्राप्त करणारी जया मोहिते (इयत्ता दहावी) आदींचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सुप्रिया जाधव हिने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती शिवराय जन्मोत्सवाचे संयोजक सतिश गिरमकर यांनी केले तर आभार खुशी निघडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशांत शिंदे, संजय घारगे, कैलास भोसले, नेहाल गिरमकर, दिलीप शिंदे, बंडू जाधव, अमोल जाधव, श्रीधर शिंदे, दिलीप निघडे, सचिन जाधव, समीर मोहिते, अशोक काटकर, राजू नलोेडे, सुधीर घारगे, संजय धोपटे, जानेश्वर आंभोरे, प्रविण माने, मोहन जाधव, नंदा गिरमकर, प्रतिभा रणनवरे, श्रृती महाडिक, राशी निघडे, तिशा यमगर, प्राची पिसाळ, रश्मी जौंजाळ, प्रिया पोटेकर आदींनी परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!