सोमनपली येथे गायीच्या गर्भातून मृत वासरू बाहेर काढून गायीचे वाचविले प्राण…

1846

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपली येथिल पशुपालक कुंडलिक भस्के यांच्या गायीवर शस्त्रक्रिया करून गायीच्या गर्भातून मृत वासरु बाहेर काढुन गाईला जीवदान दिल्याची माहिती दि.18 फेब्रुवारी रोज शुक्रवारला मदन लांबाडे नामक पशुवैद्यकानी दिली आहे.सोमनपली येथील
कुंडलिक भसके यांच्या मालकीची गाय आठ महिन्याची गाभण राहिली.गर्भात वासरू वाढत असतानाअचानक गाईचे चारा खाणे,पाणी पिणे, हालचाल करणे कमी झाले.

आज उद्या वासराचा जन्म होईल या विचारात चक्क दहा-ते बारा दिवस लोटून गेले. त्यातच गायीचे चालणे-फिरणे बंद झाले.त्यामुळे गायीचा मालक विचारात पडला एवढे दिवसात गाईने वासराला जन्म दयायला हवा होता मात्र बरेच दिवस लोटूनही गाईने वासराला जन्म न दिल्याने शेतकऱ्याला शंका आली.
दोन-तीन दिवसात गाईने वासरास जन्मास न घातल्यास अनुचित घडणार असे त्याला वाटले. लगेच त्यांनी या बाबतची माहिती पशुवैद्यकांला दिली.

पशुवैद्यकानीं गाईची पाहणी केली असता 10 ते 12 दिवसापूर्वीच गाईच्या पोटातच वासराचा मृत्यू झाल्याचे समजले. वेळीच गायिवर शस्त्रक्रिया करून मृत अवस्थेत असलेले वासरू गाईच्या पोटातून बाहेर काढणे आणि गाईला वाचविणे गरजेचे होते.ते करणे पशुवैद्यकीयापुढे मोठे आव्हानच होते.

मात्र पशुवैदकीय क्षेत्रात कार्य करणारे लांबाडे यांनी वेळीच
गाईवर शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून मृत अवस्थेत असलेले वासरू बाहेर काढून गाईचे प्राण वाचविले.
शस्त्रक्रिये दरम्यान गायीच्या शरीरातून चार ते पाच लिटर पाणी निघाल्याची लांबाडे पशुवैद्यकानीं आज सांगितले.