धानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक

1340

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
*गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागून शेतातील धान व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जारावंडी येथे घटना घडली. यात अंदाजे ३५० च्या जवळपास धानाचे भारे जळून खाक झाले आहे
रंजना गोविंद कोडापे नुकसान झालेल्या शेतक-याचे नाव आहे. रंजना कोडापे यांनि जारावंडी येथील शेतशिवारात धानाचे पुंजने ठेवले होते. त्यांनी धान मळणी करण्याकरिता आज दुपारी टॅक्टर लावून मळणीला सुरवात केली दरम्यान टॅक्टर ला शॉट सर्किट झाल्याने अचानक ट्रॅक्टरला आग लागली आग एवढी भीषण होती की टॅक्टर काढायला सुद्धा वेळ मिळाली नाही अश्यात संपूर्ण टॅक्टर जळून खाक झाली
सदर घटनेमुळे पिडीत शेतकरी यांचे अनेक नुकसान झाले आहे. आणि टॅक्टर मालकाचे सुद्धा या मध्ये खूब मोठा नुकसान झाल असून नुकसानग्रस्त शेतक-यांला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे