आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन…नववर्ष निमित्त मनोरंजनात्मक स्पर्धाचे बक्षीस वितरण.

365

नागेश इटेकर,प्रतिनिधी

राजुरा: बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने व सामाजिक वनीकरण कार्यालय राजुरा मार्फत वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धा सोबतच नववर्ष स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश धोटे,अध्यक्ष, बा. शी. प्र. मं. राजुरा हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून विजयकुमार जांभुळकर, प्रशासकीय अधिकारी न.प. राजुरा तथा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर नेफडो, प्रमुख अतिथी म्हणून विदेशकुमार गलगट, वनपरीक्षेत्र अधिकारी, राजुरा, विलास कुंदोजवार, वनपाल, सामाजिक वनिकरण विभाग , राजुरा, मनोहरराव साबनानी, उपाध्यक्ष, लक्ष्मणराव खडसे, संचालक मधुकरराव जानवे, संचालक, अविनाश निवलकर, संचालक, सारीपुत्र जांभुळकर, मुख्याध्यापक, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, बादल बेले, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक वनिकरण विभागा मार्फत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक भाग्यश्री प्रमोद लोढे, द्वितीय सरिता गणेश लोहबडे, तृतीय तन्मय मधुकर चनमेनवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरंविण्यात आले. राजुरा नर्सरी येथील नाल्यावर वनराई बंधारा निर्मिती, रांगोळी स्पर्धा, जंगल सहल , चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, सायकलिंग स्पर्धा आदींचे आयोजन करून विध्यार्थीना भेटवस्तू देण्यात आल्या. व आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. शालेय स्तरावरील मनोरंजनात्मक खेळातील विजेत्यांचे भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री धोटे यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी तर आभार ज्योती कल्लूरवार, संतोष वडस्कर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता इयत्ता सातवी, आठवी, राष्ट्रीय हरीत सेने च्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले. मान्यवरांचे स्वागत पुष्पवृक्ष भेट देऊन करणायत आले.