HomeBreaking Newsजि.प. निधी अंतर्गत ग्राम पंचायत कुडेसावली येथे दस लक्ष रुपये निधीच्या स्मशानभूमी...

जि.प. निधी अंतर्गत ग्राम पंचायत कुडेसावली येथे दस लक्ष रुपये निधीच्या स्मशानभूमी रोडचा भूमिपूजन संपन्न

नागेश इटेकर,प्रतिनिधी

गोंडपिपरी तालुक्यातील ग्राम पंचायत कुडेसावली येथे जि. प.चंद्रपूर,जनसूविधे अंतर्गत दस लक्ष रुपये निधी च्या स्मशानभूमी रोडच्या भूमि पूजनाचा कार्यक्रम पार पडला. सदर रोडचा भूमिपूजन जि.प. सदस्या सौ. वैष्णवी अमर बोडलावार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.वैष्णवी बोडलावार या धाबा – तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या विद्यमान सदस्या आहेत.निवडून आल्यापासून त्या आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा दूर दृष्टिकोन ठेवून कार्य करीत आहेत.गावात सुसज्ज रस्ते असले पाहिजे हा त्यांचा मुख्य अजेंडा असून त्या साठी झटून लाखो रुपयांचा निधी त्या खेचून आणत आहेत.राजकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत क्षेत्राचा विकास करण्याचा त्यांचा प्रयत्न अविरत चालू आहे.झालेल्या भूमी पूजनाला कुडेसावलीचे सरपंच मडावीजी,उपसरपंच राजेश्वर दोडीवारजी,पोलिस पाटील सौ. चांदेकर,माजी उपसरपंच प्रेमसागर गेडाम,श्रावण पाटील मोरे,ग्राम पंचायत सदस्य विलास सूर ,माजी तं.मू.स. अध्यक्ष गूणसागर रायपूरे,हेमंत चांदेकर,कवडू रंगारी,ग्राम सेवक खोब्रागडे, तसेच ग्राम पंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!