गोंडवाना विद्यापीठात MSW प्रवेशाबाबत भोंगळ कारभार… विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश द्यावा…

0
539

गडचिरोली /चक्रधर मेश्राम दि. 9/12/2021

गडचिरोली जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या गोडवांना विद्यापीठात MSW प्रवेशाबाबत भोंगळ कारभार झाला असून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावूनही मुलाखती न घेता परस्पर संबंध असलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. . त्यामुळे विद्यार्थ्यांना MSW अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या एम. एस. डब्ल्यू महविद्यालयात वाढीव जागा देवुन सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. तसे विद्यापीठाला शक्य नसल्यास गुणवत्ता तपासणी करण्यात यावी यासाठी पून्हा पारदर्शक पद्धतीने मुलाखती घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ नये. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा. अशी मागणी आज दिवसभर ताटकळत पडलेल्या अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादर करतांना किसन बोबड़े , शितल टेंभूर्णे,प्रतिक रायसिडाम, बालाजी शास्त्रकार, स्वप्नील डांगे, अश्विनी बोबडे,अंजली टेकाम , प्रणाली नसपुलवार, रोशन वाडकर, पायल कुभांरे, स्नेहल गहाने, प्रांजली रामटेके, प्रिती जांभुळे , सोनू जांभुळे, सोनल पल्लो , जयशिला दुर्गे, यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही संतप्त असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here