मरदिनटोला(ग्यारापत्ती) जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक.. गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाही.. चकमकीत 26 नक्षल्यांचा खात्मा..

927

गड़चिरोली : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती – कोटगुल परिसरातील मरदिनटोला जंगल परिसरात आज शनिवार ता. 13 ला पोलिस व नक्षल्यांत चकमक उडाली. सी-60 च्या जवानांना नक्षल्यांचे मोठे शिबीर उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. या चकमकीमध्ये 26 नक्षल्यांना कंठस्थानी पोहचविण्यास सी-60 च्या जवानांना यश आले.

या कारवाई दरम्यान घटनास्थ्ळावरून 100 पेक्षा अधीक पिट्टू आणि साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस- नक्षल चकमकीदरम्यान जखमी झालेल्या तीन जवानांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयाल यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सी-60 चे जवान कोरची तालुक्यातील गॅरापत्ती-कोटगुल परिसरात मरदिनटोला जंगल परिसरात नक्षल विराधी शोध मोहिम राबवित असताना जवानांना नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात या परिसरात शोध मोहिम तीव्र करण्यात आली.

नक्षल्यांना पोलिसांची भनक लागताच नक्षल्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पत्युत्तरादाखल पोलिस जवानांनी नक्षल्यांवर गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहुण नक्षली जंगलाचा फायदा घेत पळून गेले.

घटनास्थळावरून आतापर्यंत नक्षल्यांचे 26 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तर घटनास्थळाच्या निरीक्षणावरून नक्षल मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले. घटनेच्या परिसरात नक्षल विरोधी अभियान पथक तीव्र करण्यात आले आहे.