Homeगडचिरोलीगडचिरोली रामनगर येथे गोमांस विक्री करणाऱ्याला अटक

गडचिरोली रामनगर येथे गोमांस विक्री करणाऱ्याला अटक

गडचिरोली :-आज सकाळी एका विश्वसनीय गोपनीय माहिती देणाऱ्या खबरी कडून राम नगर येथे जीलानी बाबा दर्ग्याच्या मागे एका घरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती गडचिरोली शहरातील गोरक्षकना मिळाली लगेच मिळालेल्या माहितीनुसार सर्वांनी पोलीस प्रशासनासोबत नियोजनबध्द सापळा रचून रामनगर परिसरातून एका व्यक्तीला गोमांस विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीच्या घरातून टेबल वर आणि फ्रीज मध्ये ठेवलेला एकूण २१७ किलो गोमांस जप्त करण्यात आला असून, त्याचेवर गोवंश संवर्धन कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसापासून गडचिरोली शहरातून चंद्रपूर मार्गाने गाई बैलांची अवैध मार्गाने वाहतूक राजरोस पने चालू असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.ऑक्टोंबर महिन्यात पोलिस स्टेशन समोर एका आयशर कंपनी च्या मेटाडोर वाहनातून अवैध मार्गाने गाई बैलांची वाहतूक करतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.इंदिरा गांधी चौकापासून चंद्रपूर कडे जाणाऱ्या महामार्गावर एका बोलेरो वाहनाचा पिच्छा करतांना दोन गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना २२ऑक्टोंबर रोजी रात्रीला घडली होती.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.

आज गोमांस विक्री करतांना मिळालेला आरोपी हा,मागच्या महिन्यात गोतस्करांच्या हल्यात गंभीर जख्मी झालेल्या गो रक्षकांना पाहायला, सामान्य रुग्णालयात गेला होता हे विशेष. गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत कुठेही अवैध मार्गाने गाई बैलांची तस्करी,गोमांस विक्री करतांना दिसून आल्यास त्या लोकांची गोपनीय माहिती पोलिस ठाण्यात ०७१३२/२९५३३४ या टेलिफोन नंबर देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!