Homeगडचिरोलीसुरजागड रॅलीमध्ये सहभागी होणा-या नक्षलवाद्यांना अटक करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश. ...

सुरजागड रॅलीमध्ये सहभागी होणा-या नक्षलवाद्यांना अटक करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश. शासनाने जाहीर केले होते ४ लाख रुपयांचे बक्षीस. • जहाल नक्षली मुडा झोही याचेसह एका जनमिलीशिया सदस्यास अटक.

चक्रधर मेश्राम सहसंपादक

गडचिरोली : पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या पोस्टे एटापल्ली हद्दीत मौजा एटापल्ली येथे दि.२६/१०/२०२१ रोजी सामान्य नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली.शांततापुर्वक चालु असलेल्या रॅलीमध्ये काही नक्षली सामिल असल्याबाबत, गोपनिय सुत्राकडून मिळालेल्या विश्वसनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान, रॅलीच्या सुरक्षेकरीता गोपनिय पद्धतीने तैनात असतांना जहाल नक्षली मुडा मासा झोही याच्यासह जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.

अटक करण्यात आलेला जहाल नक्षली मुडा मासा झोही वय ३२ वर्षे हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल असलेल्या मौजा- गोरगुट्टा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील रहिवासी असून, त्याचेवर दि.२७/०२/२०१९ रोजी मौजा झारेवाडा, दि. १५/०३/२०२० रोजी मौजा बोडमेटा व दि. ०४/०३/२०२१ मौजा कोपर्शी (मुरुमभूशी) जंगल परिसरात झालेल्या चकमकीचे ०३ गुन्हे दाखल आहेत. तो गटटा दलममध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता.

शासनाकडून त्याचेवर ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते.जनमिलीशिया सदस्य मैनु दोरपेटी रा. बोडमेटा ता. एटापल्ली येथिल रहिवासी असून, त्याचा दिनांक१८/०९/२०२१ रोजी सोमाजी चैतु सडमेक रा. एटापल्ली या सामान्य नागरिकाची हेडरी ते सुरजागड रोडवर केलेल्या नुनाच्या गुन्हयामध्ये तसेच दिनांक ११/०५/२०२१ रोजी झालेल्या गट्टा (जां.) पोस्ट अटॅक
अशा ०२ गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. शासनाकडून त्यांचेवर ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते. तो नक्षल्यांच्या हिंसक कृत्यांमध्ये नेहमी सामिल होवून घातपाताच्या घटना घडवून आणण्यास नक्षल्यांना मदत करीत होता.

जहाल नक्षली मुडा मासा झोही व मैनु दोरपेटी या दोन्ही नक्षलींच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्यांचेवर एकुण ०४ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात विशेष अभियान पथकातील जवानांनी पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी सदर दोन्ही नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता परिश्रम घेतलेल्या जवानांचे कौतुक केले असून, नक्षलवादयांच्या हिंसक
कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!