टेंबुरवाही येथे कृषी विभागातर्फे बांधला वनराई बंधारा

0
75

-राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)

राजुरा: तालुक्यातील टेंबुरवाही येथे दिनांक २४ ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून वनराई बंधारा मोहीम अंतर्गत नाले तसेच ओढे यांच्या प्रवाहात कमी खर्चात पाणी अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या व गावातील शेतकऱ्याचे गुरे, ढोरे यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरीता तसेच रब्बी हंगामातील पिकाच्या संरक्षित ओलित होऊन पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने पचारे यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी मा. अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. संपत खल्हाटे उपविभागीय अधिकारी राजुरा ,मा. हरीश गाडे तहसिलदार राजुरा, मा. अमोल गरकल उपविभागीय वनअधिकारी राजुरा, चेतन चव्हाण प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजुरा, कृषि पर्वेक्षक नितिन कांबळे, रत्नाकर गांदगीवार, विजय भुते, कृषि सहायक दिपक काळे,तसेच कृषी विभागाचे इतर सर्व अधिकारी/कर्मचारी,कृषिमित्र गजानन चौधरी, अरविंद वांढरे , चेतन जयपूरकर,दौलत कोडाप मधुकर शेंडे व गावातील शेतकरी वर्ग उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here