वरूर रोड येथे अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित जादूचा प्रयोग कार्यक्रम

0
206

-राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)

राजुरा: अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित जादूचा कार्यक्रम एकता दुर्गा मंडळ व अचानक शारदा महिला मंडळातर्फे गांधी चौक वरूर रोड येथे आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम बालाजी मोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन समीक्षा मोडक या विद्यार्थिनीने स्वागत केले. बुवा बाबा कशी फसवणूक करून जादूटोणाच्या भूत, भानामती सांगून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात व ढोंगी देवी अंगात आणून लुबाडणूक करतात. भूत, भानामती, मंत्रतंत्र, बुवाबाजी, जादूटोणा नेमक काय आहेत? समाजातील लोक याला का बळी पडतात? महिलांनी अशा ढोंगी मांत्रिकाला बळी पडू नये चमत्कारासारखी अशी कोणतीच वस्तू नाही तर ते फक्त मांत्रिकांची हातचलाखी असते. यापासून नागरिकांनी सावध असावे. तसेच पाण्यावर दिवा पेटवणे,जिभितून त्रिशूळ काढणे, जळता कापूर तोंडात टाकने, कागदापासून पैसे तयार करून दाखवणे, ग्लासातील पाणी गायेप करणे, माचिस न लावता तुपाने होम पेटवणे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेचे समतादुत बालाजी मोरे यांनी प्रत्यक्ष प्रयोग सादर करून दाखविले. व वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती कशी निर्माण होईल याविषयी गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता दुर्गा मंडळाचे अध्यक्ष निलेश पंधरे, उपाध्यक्ष अमीर आस्वले, युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे, आदर्श तेलंग, संदीप निमकर, गोलू पुसाम, डेकोरेशन मंडळाचे संतोष भगत व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here