ग्रामपंचायत चेकपिपरीद्वारे गावचे प्रथम सैनिक समीर यांचा सत्कार

580

चेकपिपरी:-
नुकताच सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या गावातील प्रथम सैनिक समीर विनोद मुत्तेवार यांचा ग्रामपंचायत चेकपिपरी येथे छोटेखानी सत्कार करण्यात आला.
गावातील प्रथम युवक म्हणून सैन्यात भरती झाल्याने समीरचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. लताताई चौधरी यांनी समीर चा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी उपसरपंच रविभाऊ खेरकर, ग्रामसेवक राठोड साहेब, पवार साहेब कृषी सहाय्यक, तीलकचंद खारकर ग्रा. प. सदस्य, बाबुराव चनकापुरे माजी सरपंच, संगणक परिचालक अजय बारसागडे, मिनाजी कोडापे माजी ग्रा. सदस्य, शिपाई रविंद्र तरमनवार तसेच गावातील युवक बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समीरला देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. समीर ८ नोव्हेंबर ला जामनगर (गुजरात) येथे देशसेवेसाठी रुजू होणार आहे.