रासेयोच्या स्वयंसेवकांनी केला स्त्री शक्तीचा जागर

0
1109

गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी – दरवर्षी नवरात्रीला आरमोरी शहर गजबजलेले असते. या दरम्यान उपवास पकडणे पायात चप्पल न घालणे असे व्रत करून देवीची मनोभावे पूजा करतात.पण ही भक्ती करण्याबरोबरच आदिशक्तीचं संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे.त्यासाठी काही वेगळं करता येईल का ? ही गोष्ट लक्षात घेऊन संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नव्या कल्पकतेने आपल्याला समाजातल्या अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आदिशक्तीचा नुसता जयजयकार करून चालणार नाही तर आजची स्त्री सक्षम,निर्भिड,आत्मरक्षणासाठी सज्ज, अन्याय अत्याच्यारावर आवाज उठवून रोखठोकपणे लढणारी दुर्गा असली पाहिजेत. याच विचारसरणीची,सामाजिक कार्याची जाणिव ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्त्री शक्तीचा जागर अन्याय अत्याचाराविरुद्ध पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीच्या रुपाने दुर्गा माता मंदिराच्या समोर ५.००ते ६ .०० वाजे पर्यंत पथनाट्य सादर केले. स्त्री वर होणारे अत्याचार,पिळवणूक छेडछाड, बलात्कार, रॅगिंग,अॅसिड अटॅक यासारख्या गंभीर घटनांवर निशाना साधत राष्ट्रीय सेवा योजनेच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून सुरज चौधरी याच्या नेतृत्वात आज सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत करण्यात आले. शिव पार्वती देवस्थान ताडूरवार नगर मध्ये दुर्गा मातेच्या आवारात पथनाट्य लोकांसमोर सादर करण्यात आला.या पथनाट्याला खुप लोकांनी हजेरी लावली होती. पथनाट्यात स्त्रीयांवर अत्याचार कसे घडतात, कौटुंबिक हिंसा,स्त्रीभ्रूण हत्या, कशाप्रकारे केली जाते यावर प्रयोग सादर केले‌.जेणेकरून समाजातील लोकांना खरी जाणिव होईल.आज अपराधांनी परिसिमा ओलांडली आहे. त्याकरिता स्त्री सबलीकरणाचा ध्यास सर्व स्त्री वर्गाने घ्यायला पाहिजे,पोस्टरच्या माध्यमातून स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नारे लावण्यात आले. या पथनाट्याला बघण्यासाठी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली.सोबतचं भरघोस प्रतिसाद ही दिला,प्रोत्साहान पर बक्षिसं सुध्दा देण्यात आले.असेच समाजाचे डोळे उघडण्याचे सामर्थ्य आपण मनाशी घट्ट बाळगून स्त्री शक्तीचा जागर समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत‌ पोहचवावा आणि कार्यक्रम पुढे अविरत चालू ठेवावा असे समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडून प्रतिक्रिया पथनाट्याला टीम ला मिळाली. या पथनाट्याने अनेकांची मने जिंकली सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे व समोर पथनाट्याचे प्रयोग सुध्दा मिळत आहे ‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here