प्रतिनिधी सतीश कुसराम
आरमोरी येथील सुप्रसिद्ध नवरात्रोत्सवातील दुर्गा उत्सवात,येथील शारदा उत्सव मंडळ नेहरु चौक तर्फे जगन्नाथ पुरी,जगन्नाथ बाबाचा देखावा भाविकवर्गाच्या आकर्षणाचा केन्द्र बिंदु ठरावा याकरिता मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र जोमाने तयारी करीत आहेत. जगन्नाथ बाबा,विशेष करुन भगवान श्रीकृष्णाचे अवतार होय.जगन्नाथचा अर्थ म्हणजे विश्वाचे स्वामी ,जगन्नाथ बाबा एक पुजनिय देवता असुन जगन्नाथ मंदिर हिंदुच्या चार धाम मधील एक आहे.भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा आदी सोबत पुजीले जातात. शारदा मातेच्या कृपेमुळे उत्सवात भाविक वर्गाला एकत्रीत मुर्तींचे दर्शनाचा योग लाभणार आहे.देखाव्यात काशी विश्वनाथ मंदिर व महालक्ष्मी मंदिरातील मुर्तीचे देखावे सुध्दा दाखविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.या मंडळाने यापूर्वी 30 वर्षाच्या कालावधीत विष्णु अवतार महाकाल,चारधाम,स्वर्ग-नर्क,गोवर्धन- पर्वत, नाग-धाम,क्रिष्ण-लिला,नरसिंह अवतार, बाहुबली यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक live देखावे मंडळाने प्रस्तृत करुन आरमोरी परिसरात नावलौकिक प्राप्त केला आहे.







