भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाचे आयोजन…आदिवासी बांधवांना लाभ घेण्याचे आवाहन

0
63

चंद्रपूर दि. 10 ऑक्टोबर: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर या कार्यालयाच्यावतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण दिनापासून वर्षातील पुढील 52 आठवडे दर सोमवारला जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील यशसिद्ध मान्यवरांनी त्यांच्या क्षेत्रातील यश संपादनाबाबतचा जीवन प्रवास, आश्रमशाळेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे उलगडावा, त्यातून विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती पासून ध्येयप्राप्ती पर्यंतची प्रेरणा मिळावी. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यातून पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचे महत्त्व समजण्यास तसेच विविध व्यवसायाची ओळख होण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण तसेच व्यवसायाबाबतची जागरूकता वाढीस लागून चालना मिळेल. सदर उपक्रम एटीसी नागपुर, नवचेतना या यूट्यूब चैनलवर उपलब्ध असणार आहे.

या उपक्रमामध्ये नागपूर,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या सहाय्यक संचालक परिनीता पंधराम, नागपूर जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मनोहर मेश्राम, एल. पी.कोडापे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सदर उपक्रमाचे मार्गदर्शन यूट्यूब च्या माध्यमातून दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता https://youtu.be/y5uFGEeateY या लिंकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच दर सोमवारी प्रक्षेपित होणार्‍या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळविण्याकरिता https://www.youtube.com/channel/UCAD2ThI78aZ-rB58-JcjscA या लिंकद्वारे एटीसी नागपुर- नवचेतना या चॅनलला सबस्क्राईब करावे. तरी सदर मार्गदर्शनाचा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी व आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे व चिमूर येथील प्रकल्प अधिकारी के. ई.बावनकर यांनी केले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here