Homeचंद्रपूरब्रम्हपुरीमध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपदग्रस्ताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण..बँकेचे उपाध्यक्ष यशवंत...

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपदग्रस्ताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण..बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या हस्ते वितरण

ब्रम्हपुरी::-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीअंतर्गत सिरपुर येथील सत्यफुला सदाशिव निकोडे यांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांच्या हस्ते ब्रम्हपुरी येथील बँकेच्या शाखेत करण्यात आले.

सिरपुर येथील सदाशिव निकोडे हे शेतीच्या पाहणीसाठी आपल्या शेतावर गेले होते. तेव्हा त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी व ३ मुले आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आता त्यांचे कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले. याची माहिती बँकेच्या संचालक मंडळाला होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने सदर कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.

सदर धनादेशाच्या वितरणप्रसंगी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र मातेरे, सी.डी.सी.सी. बँक ब्रम्हपुरी शाखा व्यवस्थापक संजय वणवे यांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कँन्सरग्रस्त,हार्ट अटँक, गंभीर दुर्धर आजार या रुग्णांना उपचारासाठी ४० हजार रुपये तर साप,विंचु चावून, वीज पडून मृत्यू झालेले, धानाचे पुंजणे जळालेल्या नागरिकांना आर्थिक मदतीचा आधार दिला जातो असे यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांनी सांगितले.

-प्रतिभा मैंद
( 7972250918)

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!