Home चंद्रपूर राजुरा आदिवासी विकास परिषदेकडून विनोद गेडाम यांना शुभेच्छा

आदिवासी विकास परिषदेकडून विनोद गेडाम यांना शुभेच्छा

राजुरा: उमदा व्यक्तिमत्व असलेले अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुराचे तालुका अध्यक्ष विनोद गेडाम यांचा ४९ वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना भरभरुन शुभेच्छा. विनोद गेडाम यांचा जन्म १/१० /१९७२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी या गावात झाला. लहानपणापासूनच चित्रकला, रांगोळी, नाटक, लेखन, वकृत्व, नृत्य, वेगवेगळी भूमिका साकारणे अशी अनेक कलागुण त्यांच्या अंगी होते.तसेच त्यांना नाटक, लेखन व दिग्दर्शकाचे उत्कृष्ट कलाकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या घरची आर्थिक परीस्थिती अतिशय हलाखीची होती.कुटुंबात तीन भावंड त्यापैकी विनोद गेडाम हे दुसरे, कुटूंब मोठे असल्याने त्यांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात अनेक समस्यांना पुढे जावे लागले. परंतु त्यांनी आपले शिक्षण अपूर्ण न ठेवता ते पूर्ण तडीस नेले. अंगी अपार जिद्द, चिकाटी होती. त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करत जिद्दीने शिक्षण घेत रेवणी विभागात पटवारी या पदावर नौकरी मिळवली. नौकरीचा पहिला टप्पा हा अतिशय कठीण होता, पहाड परीसरात त्यांची नेमणूक झाली, त्यांच्यावर भरपूर गावाचा प्रभार होता, येण्या- जाण्याकरिता वाहनाची साधने नव्हती, पगारही खूप कमी, अशा कठीण परिस्थितीत त्यांनी स्वतःला सांभाळून घेत आज इथपर्यंत पोहचले आहे.आजच्या या सुखमय घडीला बघून त्यांच्यामध्ये समाजा बद्दलची आपुलकी, प्रेम भावना निर्माण झाली. समाजातील गोरगरिबांचे कामे कसे करता येईल यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.

त्यांनी समाजसेवेत स्वतःला वाहुन घेतले, लाॅकडाऊनच्या काळात गरजूंना खुप मोलाची मदत केली मग ते अन्नधान्याची असो वा आर्थिक असो ती मदत वाखाण्याजोगी आहे. विनोद गेडाम हे अभ्यासू शांत, संयमी स्वभावाचे, विदर्भ पटवारी संघ चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे. या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे, महाराष्ट्र शासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार २०१३ मध्ये देण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर एस. डि.ओ राजुरा यांच्या तर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.असे अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या नौकरीच्या कार्यकाळात मिळाले आहे, परंतु त्यांनी आपली प्रसिध्दी कधीही सोशल मीडियावर केलेली नाही, भविष्यात आदिवासी समाजाचे ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्याची क्षमता त्यांच्यात दिसुन येते.विनोद गेडाम यांच्या रुपात मिळालेले आदिवासी समाजाला त्यांचे श्रेय विसरता येत नाही.

विनोद गेडाम यांना वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आले.

दिपक मडावी
अ.भा.आ.वि परीषद राजुरा
तालुका सचिव

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

सिंधी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन…

राकेश कडुकर राजूरा तालुका प्रतिनिधि राजुरा तालुक्यातील सिंधी येथे 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी नवीन ट्यूबवेल व वाल दुरुस्ती, 100% नळ कनेक्शन तसेच मानव विकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!