HomeBreaking Newsशेतकऱ्यांच्या 'भारत बंद' ला जिवती तालुका काँग्रेस कमेटीचा जाहीर पाठिंबा.

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला जिवती तालुका काँग्रेस कमेटीचा जाहीर पाठिंबा.

दिपक साबने,जिवती(प्रतिनिधी)

जिवती : नवीन कृषी कायदे हे संसदेत लोकशाहीची पायमल्ली करून बनवण्यात आले आहे. हे कायदे देशाच्या अन्नसुरक्षेसाठी धोकादायक आहेत. यामुळे आपला शेतकरी आणि कृषी व्यवस्था नष्ट होईल. २७ सप्टेंबरला भारत बंदला कॉंग्रेसचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे. या आधीही कॉंग्रेस पक्षाने संसदेपासून ते रस्त्यापर्यंत शेतकरीविरोधी तिन्ही काळ्या कायद्यांविरोधात जोरदार लढा दिला आहे.आणि पुढे सुद्धा लढत राहू.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर बापुराव शेडमाके चौक जिवती काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिवती तालुक्यात ग्रामीण व शहर काँग्रेस च्या वतीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात जिवती बंद करून आंदोलन करण्यात आले.

भारत बंदच्या मुख्य मागण्या घेऊन शेतकरी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन
१) शेतकऱ्यांच्या विरोधातील तीनही जुलमी काळे कायदे,
२) दिल्लीमध्ये मागील ११ महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन,
३) कामगारांना बर्बाद करण्याचा कायदा.
४) देशातील तरुणांना बेरोजगार करणारा कायदा
५) पेट्रोल , डिझेल व घरघुती गॅससह जीवनाश्यक वस्तूची कुत्रीम महागाई विरोधात.

भारत बंद आंदोलनात जिवती तालुका काँग्रेस कमेटी, तालुका युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अनु.जाती,जमाती काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, ओबीसी सेल , सोशल मीडिया , तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन निषेधाची फलके घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता व्यायसायिक बाजारपेठ इत्यादी कडकडीत बंद ठेऊन तालुक्याच्या ठिकाणी मोदीच्या जुलमी राजवटीचा निषेध करण्यात आले.

यावेळी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कंटू कोटनाके, विजय राठोड उपाध्यक्ष, सुग्रीव गोतावळे, भोजी पाटील आत्राम,अशपाक शेख जिल्हा महासचिव, माजी उपाध्यक्ष, नगरपंचायत जिवती,अल्पसंख्याक अध्यक्ष जब्बार शेख, सिताराम मडावी, सत्तरशाह कोटनाके, आशिष डसाने,नंदाताई मुसने ,शामराव गेडाम, बाजीराव पाटील वल्का, शेख जब्बार भाई, विष्णू रेड्डी, मारू पाटील नैताम, सूरज चिटके, संतोष बोईनवाड, लहुजी गोतावले, विलास पवार, मारोती कुमरे, रोहीदास आडे, विलास वाघमारे, सुनील शेळके तालुका शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!