Homeचंद्रपूरराजुराई-पीक नोंदणीकरीता ती धावली शेतकऱ्यांच्या बांधावर

ई-पीक नोंदणीकरीता ती धावली शेतकऱ्यांच्या बांधावर

राकेश कडुकर (राजुरा तालुका प्रतिनिधी)

राजुरा: तालुक्यातील वरुर रोड या गावात ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेता कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे अंतिम वर्षाला पदवीचे शिक्षण घेणारी मेघा सुकराज करमकर हिने अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच पीक पेऱ्याची नोंदणी करून दिली. शेतकऱ्यांनी हा ॲप कसा हाताळावा आणि त्यात माहिती कशी भरावी.ई पीक पाहणीचे भविष्यात फायदे काय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. येवढेच नाही तर ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) च्या माध्यमातून याआधी गावात अनेक प्रात्यक्षिके मेघाने राबविली आहे.
बीज प्रक्रिया , सुरक्षित कीड नियंत्रण, ॲझोला उत्पादन, कोविड लसीकरण , सुरक्षित तन नियंत्रण , मातीचे नमुने कसे तयार करायचे तसेच पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्या माध्यमातून २००ते २५०० जनावरांचे लसीकरण केले. येवढेच नाहीतर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून पिकांवरील रोग व कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय शेतकऱ्यांना सांगितले. ई पीक पाहणी करताना युवा समाजसेवक गावचे कृषी मित्र विशाल शेंडे,कृषी महाविद्यालय गडचिरोली येथील मेघा करमनकर, मारोतराव वादाफळे, तसेच कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील साहिल तिजाळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!