बाबूपेठ येथील अल्पवयीन मुलीच्या तक्रारीची दखल न घेणे भोवणार…तो पोलीस कर्मचारी होणार निलंबित – विजय वडेट्टीवार यांची माहिती

0
355

चंद्रपूर, बाबुपेठ येथील अल्पवयीन मुलीने विवाहित व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी त्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेतली नाही. पुढे संबंधित व्यक्तीने चाकू हल्ला केला. यात मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बाबुपेठ येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची मंगळवार, 21 सप्टेंबर रोजी सांत्वनपर भेट घेतल्यानंतर वडेट्टीवार बोलत होते. अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करून ठार करण्याची घटना जिल्ह्यासाठी धक्कादायक असून, मन हेलावणारी आहे. घरातील कमावत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे घरातील एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचे आधीच आदेश देण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, आरोपी सुटता कामा नये यासाठी आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल हे सांगण्यासाठी भेट घेण्यात आल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here