वांगेपल्ली रस्त्यावर रोवनी करून शासन व प्रशासनाचा वेधले लक्ष…

0
186

अहेरी:- अहेरी – महागाव मुख्य रस्त्यापासून वांगेपल्ली कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणा खड्डे निर्माण झाले असून रहदारीस ग्रामस्थांना व बाहेरील ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर यांनी समस्त वांगेपल्ली, गेर्रा,महागाव व अहेरी येथील नागरिकांनासह रस्त्यावरील खड्ड्यात रोवणी करून शासन व प्रशासनाच्या लक्ष वेधले आहेत.

अहेरी – महागाव मार्ग पासून वांगेपल्ली पुलापर्यंतचा रस्ता तसेच गेरा मार्गाने वांगेपल्ली जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत, त्यामुळे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठी कसरत करत खड्ड्यातुन मार्ग काढत जावे लागत आहे, त्याचप्रमाने नागरिकांनी अनेकदा रस्ता बनविण्यात यावे म्हणून पाठपुरावा करून सुद्धा या रस्ताकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर उतरून रोवणी करावे लागत आहे.

गावकऱ्यांकडून चिखलात रोवणी, येथील गेरा, वांगेपल्लि, महागाव व अहेरी येथील नागरिकांनी गुरुवार ला संध्याकाळी रस्ता खराब असल्याने या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे रस्ते बनवणार की नाही हेच प्रश्न मोठा निर्माण झाला आहे, या उद्देशाने शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या खड्ड्यात रोवणी करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ता दिपक सुनतकर, चेतन दुर्गे, वेंकटेश येनपरेद्दीवार, आशिष सुनतकर, कोटा काका, तसेच आदी गावातील महिला तरुणींनी सहभाग घेतले आहेत.

तेलंगणा बससेवा बंद
अहेरी महागाव पासून वांगेपल्ली पुलाला जोडणारा रस्त्यावर ठीक ठिकाणी जीवघेणा खड्डे निर्माण झाले आहेत, या खड्डयातुन चारचाकी वाहने काढणे सुद्धा शक्य नाही त्यामुळे महाराष्ट्र येत असलेली तेलंगाणा बससेवा बंद करण्यात आली आहे अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here