Home चंद्रपूर जिवती मराठवाडा मुक्ती संग्राम दिना प्रित्यर्थ श्रीयुत खलाटे उपविभागीय अधिकारी यांचे हस्ते शासकीय...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिना प्रित्यर्थ श्रीयुत खलाटे उपविभागीय अधिकारी यांचे हस्ते शासकीय ध्वजारोहण

दिपक साबने,जिवती प्रतिनिधी

जिवती : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोविड-१९ चे सर्व नियम पाळत तालुक्याच्या मुख्यालयी म्हणजेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी श्रीयुत खलाटे यांच्या हस्ते माजी आमदार निमकर व नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना व दोन दिवसानंतर म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी म्हणजेच तब्बल १३ महिन्यानंतर मराठवाड्यासह पूर्वीचा राजुरा तालुका व आजचे राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेततृत्वात लढलेल्या लढ्यात या भागातील देशभक्तांनी सुध्दा भाग घेतला होता. निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी देशाचे पाहिले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सैन्य चढाई चे आदेश देऊन निजामाच्या राजवटीतून याचदिवशी निजामाच्या अधिपत्याखालील संस्थान देशात विलीन केले. व मराठवाड्यासह आजचे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजुरा येथील जनतेला स्वतंत्र मिळाले.

या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते देशोन्नती वृत्तपत्रातील “राजुरा मुक्तीसंग्राम दिन” विशेषांकाच्या पुरावणीचे प्रकाशन करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, न. प. चे मुख्याधिकारी पिदूरकर, पोलीस निरीक्षक बहाद्दूरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व प्रतिष्ठित व्यक्तीसह कर्मचारी उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

आदिवासी सोसायटीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चा सुफडा साफ

बळीराम काळे/जिवती जिवती: आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था, जिवती येथील झलेल्या निवडणुकीत गोंडवाना प्रनित पॅनलच्या १३ पैकी १३ उमेदवारानी दणदणीत विजय प्राप्त करत काँग्रेस, राष्ट्रवादी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!