प्रेमात खचलेल्या तरुणाने चक्क आमदाराला च लिहिले पत्र मुली पटत नाही,भाव देत नाही यावर पुढाकार घ्यावा अशा आशयाचे आहे पत्र

0
634

दिपक साबने,जिवती

जिवती: मुली पटत नाहीत, भाव देत नाहीत म्हणून चक्क एका तरुणाने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील भूषण जामुवंत राठोड या तरुणाने चक्क आमदाराला च पत्र लिहून मुली पटत नाही, भाव देत नाही माझ्यावर घोर अन्याय होत आहे असह्य होत आहे असे चक्क अमदारालाच पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सम्पूर्ण तालुक्यात भरभरून मुली असून मला एकही गर्लफ्रेंड नाही. मी राजुरा ते गडचांदूर येथे दररोज फेऱ्या मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू पिणाऱ्याला, काळ्या डोमळ्याना गर्लफ्रेंड असते हे बघून माझा जीव जाळून खाक होतो. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे यावर आमदार साहेबानी काहीतरी केले पाहिजे अशा आशयाचे पत्र एका अवलिया तरुणाने आमदारांना लिहिले आहे.
सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल होत असलेल्या सदर पत्रामुळे एक वेगळीच चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here