HomeBreaking Newsपांचाळा वासीयाकडून सपत्नीक सत्कार जिवतीचे सुपुत्र बाभूमिया शेख यांचा आदर्श शिक्षक...

पांचाळा वासीयाकडून सपत्नीक सत्कार जिवतीचे सुपुत्र बाभूमिया शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

दिपक साबने,जिवती

जिवती: पंचायत समिती राजुरा अंतर्गत कार्यरत असलेले उपक्रमशील व तंत्रस्नेही भाषा विषय शिक्षक जि. प. उच्च प्राथमिक शाळा पंचाळा येथील विषय शिक्षक जीवतीचे सुपुत्र बाबूमिया ख्वाजामिया शेख यांना विजय वडेट्टीवार , पालकमंत्री तथा मदत व पूनर्वसन मंत्री यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.
जिवतीचे सुपुत्र बाबूमिया ख्वाजामिया शेख हे इंग्रजी विषयाचे ज्ञानार्जनाचे कार्य करतात. वयाच्या ५५ मध्ये सुध्दा दररोज ऑनलाईन गुगल मीट, झूम व गुगल क्लासरूम द्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. बाबूमिया शेख यांनी जिवती, मंगी (बु) या दुर्गम आदिवासी भागात ३० वर्ष सेवा दिली तसेच भेंडाळा व पांचाळा येथे ३ वर्ष सेवा दिलेली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या इंग्रजी विषयाच्या प्रभावी अध्यापनाचा ठसा हजारो विद्यार्थ्यांवर उमटलेला दिसतो. त्यांच्या काळात अनेक उपक्रम राबवून शाळेला उंचीवर नेण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे.
पांचाळा येथे गाववासीयांच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित बाबू ख्वाजामिया शेख यांचा पांचाळा ग्रामवासीयांच्या वतीने शाल, श्रीफळ, साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, तंटा मुक्त गाव समिती, स्वंय सहाय्यता गट, गुरुदेव सेवा मंडळ, नवयुवक मंडळ इत्यादींनी केले होते.सत्कार समारंभासाठी गावातील महिला, पुरुष व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!