दिपक साबने,जिवती
जिवती: चंद्रपूर जिल्हयातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील रोडगुडा, पेदाआसापूर,घनपठार या तीनही गावात मागील १५ दिवसापासून DP (रोहित्र) मध्ये बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा तीनही गावात बंद होता.त्यामुळे तीनही गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
सुदामभाऊ राठोड यांनी महावितरण विभागाला वारंवार सदर समस्येच्या लेखी तक्रारी दिल्या विनंती केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर सतत त्यांचा पाठपुरावा केला.पाठपुरावा करत असताना एक रात्र ३३ के.व्ही.सबस्टेशन जिवती येथील कार्यालयात झोपले सुद्धा अखेर त्यांच्या प्रयत्नाने रोडगुडा, पेदाआसापूर व घनपठार या तीनही गावासाठी DP (रोहित्र) मंजूर झाले त्यापैकी रोडगुडा, पेदाअसापूर या दोन्ही गावात DP (रोहित्र) बसवण्यात आले. उद्याला घनपठार येथे सुद्धा DP (रोहित्र) बसवण्यात येणार आहे.
सुदाम राठोड,युवा जिल्हाध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर यांच्या प्रयत्नामुळे तीनही विद्युत ची समस्या सुटली आहे. त्यांना गोवर्धन राठोड, हरीचंद राठोड, जयपाल चव्हाण, रोडगुडा, पेदाआसापूर व घनपाठर या तीनही गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.






