देशाला उन्नत व एकसंघ ठेवण्यात काँग्रेस चे मोठे योगदान -आमदार सुभाष धोटे

0
72

दिपक साबने,जिवती

जिवती : येथे काँग्रेस चे तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सुभाष धोटे, आमदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तसेच विदर्भ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जिवती येथील सभागृहात तालुक्यातील काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
स्वातंत्र्य प्राप्ती ते स्वातंत्र्योत्तर भारतात सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे. आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्पबद्ध होऊन काँग्रेसचे विचार, आचार घराघरापर्यंत पोहोचविले पाहिजे. जिवती तालुक्याच्या विकासासाठी काँग्रेसचे भरीव कार्य आहे. यापुढेही येथे अनेक सुविधा व विकासकामे आपल्या पक्षाच्या व सरकारच्या माध्यमातून होणार आहेतच. देशाला उन्नत व एकसंघ ठेवण्यात काँग्रेसचे खूप मोठे योगदान आहे असे उदघाटकीय मार्गदर्शनात आमदार सुभाष धोटे यांनी प्रतिपादन केले.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत सिताराम मडावी यांना जिल्हा महासचिव युवक काँग्रेस कमेटी चंद्रपूर, कंटू कोटनाके यांना अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कमेटी, बाजीराव वल्का यांना अध्यक्ष अनुसूचित जमाती विभाग जिवती, जब्बार शेख यांना अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जिवती, अकबर पठान यांना शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जिवती, श्यामराव गेडाम अध्यक्ष शहर काँग्रेस कमेटी जिवती, दत्ता भाऊ गिरी आणि विष्णू भाऊ रेड्डी यांना ओबीसी विभागाचे ग्रामीण अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील मडावी, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख मार्गदर्शक राजुरा नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, प.स. सभापती अंजनाताई पवार, सिताराम कोडापे,भाऊराव चव्हाण, गणपत आडे अध्यक्ष, काँग्रेस पार्टी, सुग्रीव गोतावळे, तिडके पाटील, अश्फाक शेख, नंदाताई मुसने, अध्यक्षा तालुका महिला काँग्रेस पार्टी, प.स.सदस्य गोतावळे ताई, माधव डोईफोडे, सत्तरशहा कोटनाके, सिताराम मडावी, तजुद्दिन शेख, भीमराव पवार,
दता तोगरे, दता गायकवाड, बंडू राठोड, डॉ.बन्सोड, बाळू पतंगे, कैलास कुंडगिर, विजय राठोड, सुभाष राठोड, विलास वाघमारे, सुनील शेळके, विष्णू रेडी, रोहिदास आडे, जिवती तालुक्यांतील असंख्य युवक, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here